बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ‘माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार 2019’चे वितरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयात आज झाले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, धनादेश, शाल व तुळस प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

प्रभाग समिती अध्यक्षांना 50 हजार, सहाय्यक आयुक्तांना रुपये 30 हजार, अधिकाऱ्यांना 30 हजार, 3 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार (एकूण 30 हजार) आणि 3 कामगारांना प्रत्येकी 5 हजार (एकूण 15 हजार) याप्रमाणे एकूण 1 लाख 55 हजार रुपयांची रोख रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.

पुरस्कार विजेते 

उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून सचिन पडवळ (एफ/दक्षिण व एफ/उत्तर) यांना सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट सहाय्यक आयुक्त म्हणून शरद उघडे (जी/दक्षिण) आणि किरण दिघावकर (जी/उत्तर) यांना, उत्कृष्ट गुणवंत अधिकारी म्हणून उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून आर/उत्तर विभागातील परिचारिका पूजा नाणोसकर, निरिक्षक (बाजार) धर्मा राठोड, नायर रुग्णालयातील मुख्य लिपिक नरेश नाईक, उत्कृष्ट कामगार म्हणून देवनार पशुवधगृह येथील श्रमिक अशोक ससाणे, जी/उत्तर विभागातील रोडरोलर स्वच्छक मुल्लाजी रफिक अब्दुल कादिर, नायर रुग्णालयातील हमाल प्रवीण आडिवरेकर यांना सन्मानित करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या