वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय माहितीपट स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय माहितीपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहितीपट स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेतील अंतिम पाच विजेत्यांचा रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून मोठय़ा संख्येने स्पर्धक त्यात सहभागी होतात, परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार वक्तृत्व स्पर्धेऐवजी माहितीपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱया स्पर्धकांना माहितीपट बनवून [email protected] या ई-मेलवर 20 जानेवारी 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी 1800228595 या क्रमांकावर सकाळी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी

  • स्पर्धा विनाशुल्क आहे.
  • स्पर्धेकरिता एकच खुला गट आहे.
  • माहितीपट किमान 3 मिनिटे व जास्तीत जास्त पाच मिनिटांचा असावा.
  • चित्रिकरण व आवाजाचा दर्जा उत्तम असावा.
  • माहितीपट पाठवताना ई-मेलमध्ये स्पर्धकाचे नाव, गाव, तालुका, जिल्हा व व्हॉटस्ऍप क्रमांक नमूद करावा.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

स्पर्धेचे विषय

  • वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
  • लोकनायक माननीय उद्धवजी ठाकरे
  • माझा महाराष्ट्र, माझा अभिमान!