कुर्ल्यातील म्हाडा वसाहतीत बाळासाहेब ठाकरे नगर स्मृती शिल्प

492

कुर्ला विधानसभेच्या टिळक नगर पुर्वेकडील म्हाडाच्या वसाहतीत हिंदुह्दयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नगर अशा नामकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार वसाहतीच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे नगर असा नामफलक आणि स्मृती शिल्प उभारण्यात आले आहे.विभागप्रमुख, आमदार मंगेश कुडाळकर यांच्या आमदार निधीतून या स्मृती शिल्पाचे काम करण्यात आले असून त्यांच्या हस्ते या स्मृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपविभागप्रमुख संदीप गावडे, संघटक दिलीप शिंदे, शाखाप्रमुख दिलीप मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताराम आंबरे, बाळकृष्ण सुर्वे, शिल्पकार विनायक सुर्वे, भावेश चित्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि म्हाडा रहिवाळी मोठया संख्येने उपस्थित होते. म्हाडा वसाहतीच एकूण 18 इमारती आणि 1124 घरे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या