दुधाचे रखडलेले अनुदान लवकरच मिळणार – बाळासाहेब थोरात

545
balasaheb-thorat

मागील सरकारने गाईच्या दुधासाठी व दुध भुकटीसाठी अनुदान देण्याची केवळ घोषणाच केली. त्या योजनेतील सुमारे 128 कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडे अजून रखडलेले असून ते अनुदान लवकरच दूध संघांना देण्याच्या सूचना दुग्ध विकास मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. याबाबत दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे दुग्ध विकास मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत शासनाकडे थकीत अनुदान मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी थकीत अनुदान व दुग्ध व्यवसायातील अडचणी वर चर्चा झाली. रखडलेले दुधाचे अनुदान त्वरित देण्याच्या सूचना संबंधित विभागाला थोरात यांनी दिल्यामुळे रखडलेले अनुदान लवकरच मिळणार आहे.

यावेळी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष म्हस्के, कात्रज दूध संघाचे चेअरमन विष्णू हिंगे,राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख ,राजाराम बापू दूध संघाचे चेअरमन विनायक पाटील, सोनई दूध संघाचे अध्यक्ष दरशर माने,पराग दूध संघाचे अध्यक्ष प्रितम शहा,चितळे दूध संघाचे अध्यक्ष श्रीपाद चितळे  एस आर थोरात दूध संघाचे अध्यक्ष आबासाहेब थोरात व  सहकारी खासगी दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  तसेच दुग्ध विभागाचे सचिव अनुप कुमार, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त नरेंद्र पोयम, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी चर्चेच्या वेळी उपस्थित होते. कल्याणकारी संघाच्यावतीने थोरात यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

मागील सरकारच्या काळात दुग्ध व्यवसायात अनेक चढउतार व नव-नवीन नियमावली मुळे दूध संघांना तोटे सहन करावे लागले होते. शासनाचे अनुदान वेळेवर येत नसल्याने दूध संघांनी उत्पादकांना शासनाच्या अनुदान येण्याच्या अगोदर रक्कम दिल्यामुळे काही संघ अडचणीत आले होते. परंतु मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रखडलेले अनुदान त्वरीत देण्याच्या सुचना संबंधित विभागाला केल्या मुळे दूध संघ व उत्पादक शेतकरी यांना दिलासा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या