विमानात पॉवर बँक वापरण्यास बंदी

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानात उड्डाणादरम्यान पॉवर बँक किंवा पोर्टेबल चार्जरचा वापर करून मोबाइल पह्न किंवा इतर

इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करण्यास बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चार्जिंगसाठी वापरल्या जाणाऱया लिथियम बॅटरीमुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन डीजीसीएने हा निर्णय घेतला. त्याचबरोबर विमानातील आसनाच्या ‘पॉवर आउटलेट’द्वारेही मोबाईल, इलेक्ट्रिक उपकरणे चार्ज करण्यास बंदी घातली आहे.

विमान पंपन्यांनी क्रू मेंबर्सना विशेष प्रशिक्षण देणे, सुरक्षा मूल्यांकन सुधारणे आणि आग प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करण्याचे निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. प्रवाशांनी या नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.