रॅम्प वॉक बेतले जिवावर, तरुणीचा मृत्यू

1040

महाविद्यालयातील फ्रेशर पार्टी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. प्रत्येकाच्या मनात फ्रेशर पार्टी बद्दलच्या अनेक आठवणी दडपलेल्या असतीलच फ्रेशर पार्टी मध्ये काही नवीन मित्र बनतात तर काही प्रेमाची नाती जुळतात आभ्यासाचे सारे ताण-तणाव विसरू काही वेळेसाठी आपण एका वेगळ्याच जगात जातो जीथे मनमोकळे पणा, नाचगाणे आणि मस्ती असते. म्हणूच तर फ्रेशर पार्टीची तयारी एक महिना आधी पासूनच सुरू होते कपडे कोणते घालायच डान्स कोणता हे सगळ आधीच ठरलेल असत. अशाच प्रकारे फ्रेशर पार्टीमध्ये रॅम्प वॉक करणे एका तरुणीच्या जिवावर बेतले सदर घटना बेंगळुरूमधील आचार्य इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल महाविद्यालयातील आहे.

आचार्य इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल महाविद्यालया तर्फे सिग्नेचर हॉटेलमध्ये फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. इथे एक आनंदमय वातावरण तयार झाले होते. त्याच सोबतच प्रथम वर्षीय शिकत असलेली एक विद्यार्थिनी तीचे नृत्य सादर करण्याकरिता स्टेजवर आली आणि रॅम्प वॉक करू लागली. काही वेळाने अचानकच ती खाली पडली काही क्षणासाठी वाटले की कदाचित ती स्टॅन्डअप कॉमिडप करत असावी पण बराच वेळती उठली नाही तेव्हा तीला स्टेजवरून उचलून खाली आणण्यात आले आणि एका बाकावर बसवण्याचा प्रयत्न केला परंतु तिची काहीच हालचाल होत नाही आहे हे लक्षात येताच तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ही घटने संदर्भातील तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल झाली असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तरुणीचा मृत्यु हे हृदयविकाराचा झटका आल्याने झाला आहे. तर पोलिसांनी फौजदारी कलम 174 (C) अंतर्गत गुन्हा दाखल करून तिचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू आहे असे घोषित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या