शिवाली, हे खरंय का? महिन्याला 7 लाख खर्च करण्याची जोडप्याला चिंता

देशभरातील नोकरदारांची एकच चिंता ती म्हणजे पगार पुरत नाही. परंतु, बंगळुरूमधील एक जोडपे असे आहे. त्यांना पगार कुठे खर्च करावा हे कळत नाही. पैसे खर्च करण्याचे माहीत नसल्याने ते सध्या खूपच चिंताग्रस्त आहेत. हे कपल टेक्निकल एक्सपर्ट आहेत. हे दोघे जण महिन्याला 7 लाख रुपये कमवतात. हे पैसे खर्च कसे करावे, यासाठी यांनी सोशल मीडियात लोकांकडे मदत मागितली आहे. यासंबंधीची सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटले की, हे दोघे पती-पत्नी बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतात. यांना अपत्य नाही. या दोघांची मासिक कमाई 7 लाख रुपये आहे. त्यातील 2 लाख रुपये ते म्युच्युअल फंडमध्ये टाकतात. सर्व मिळून दर महिन्याचा खर्च दीड लाख रुपये आहे.

बंगळुरूमध्ये चांगल्या सोसायटीत राहतो. घरी कार आहे, खर्च करण्यातही आम्ही मागे पुढे पाहत नाही. अमाप खर्च करूनही खात्यात 3 लाख रुपये शिल्लक राहतात. त्यामुळे हे पैसे कुठे खर्च करावे, हे समजत नाही, असे जोडप्याने म्हटलेय.