हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीवर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, मोदींचा उल्लेख करत मोहम्मद युनूस म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी शस्त्रसंधीवर एकमत झाले. हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. हिंदुस्थान-पाकिस्तानच्या या भूमिकेचे जगभरातील नेत्यांची स्वागत केले. आता यावर बांग्लादेशच्या अंतरिम सराकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. युनूस यांनी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर याबाबत पोस्ट लिहिली आहे.

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तत्काळ शस्रसंधींवर एकमत दर्शवल्याबद्दल आणि चर्चेबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये प्रभावीपणे मध्यस्थी केल्याबद्दल मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचेही कौतुक करतो, अशी पोस्ट मोहम्मद युनूस यांनी केली आहे.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन, मिसाईलचा मारा केला. मात्र हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टमने सर्व हल्ले परतवून लावले. एवढेच नाही तर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई तळ बेचिराख केले. हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाला युद्धाचे स्वरुप येत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला.

पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल