बांग्लादेशीने ‘विक्रम’ हरवल्याच्या आनंदात रसगुल्ला खाल्ला आणि ढगात गेला!

5757

इस्रोच्या चांद्रयान-2 बरोबर विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये आनंद साजरा केला जात आहे. फटाके फोडून आणि एकमेकांना गोडधोड भरवून या दोन्ही देशातील नागरिक विकृत आनंद साजरा करत असतानाच एका बांग्लादेशी नागरिकाचा याच आनंदात रसगुल्ला खाताना मृत्यू झाला आहे. रेझाऊल शेख करीम असे त्याचे नाव आहे.

न्यूज 18 असम या वृतसंकेतस्थळाने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार विक्रम हरवल्याने पाकिस्तान आणि बांग्लादेशी नागरिकांनी आनंद साजरा केला. यावेळी आतिषबाजी करत काहीजणांनी आनंद व्यक्त केला. त्याचवेळी बांग्लादेशमध्ये नोआखाली भागात राहणारा रेझाऊल मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यानंतर रात्री 2 च्या सुमारास त्यांना रसगुल्ला खाऊन आनंद साजरा करण्याची इच्छा झाली. त्यामुळे ते दुकानात गेले. तेथे गरमागरम रसगुल्ला खाताना एक रसगुल्ला रेझाऊलच्या घशात अडकला आणि त्याचा श्वास कोंडला गेला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या