‘जमात’च्या दहशतवाद्याला चेन्नईत अटक

326

जमातउलमुजाहिद्दीन बांगलादेश’ (जेएमबी) या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या असदुल्लाह शेख याला एनआयएच्या पथकाने मंगळवारी सकाळी चेन्नईतून अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दहशतवाद्याचा ठिकाणा असलेल्या संपूर्ण परिसरास वेढा दिला होता. या दहशतवादी संघटनेचे आणखी 104 दहशतवादी एनआयएच्या रडारवर आहे.

याआधी कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने 2 सप्टेंबरलाही दहशतवादी या संघटनेच्या मोहम्मद अब्दुल कासीम ऊर्फ कासीम (22) याला बेड्या ठोकल्या होत्या. तो बर्दवान जिल्ह्यातील मंगलकोटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुरमुट गाचा रहिवासी होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरूनच मंगळवारी पोलिसांनी असदुल्लाह शेखला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या