बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालेद झिया यांचे निधन

बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालेद झिया यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.


खालेद झिया या दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या आहेत. 1991-1996 आणि 2001 ते 2006 असे दोन टर्म त्या पंतप्रधान होत्या. त्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा देखील होत्या. मुस्लीम बहुल देशात एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या महिला अध्यक्ष असणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्यांच्या आधी पाकिस्तानमध्ये बेनझिर भुत्तो या त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा होत्या.

फेब्रुवारीत लढवणार होत्या निवडणूका

खालेद झिया या बांग्लादेशमध्ये येत्या फेब्रुवारीमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढवणार होत्या. त्यासाठी सोमवारीच त्यांच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोगुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता.