बँक ऑफ बडोदाचे गृहकर्ज स्वस्त

बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. आधी गृहकर्ज व्याजदर 8.40 टक्के होता, परंतु आता बँकेने हा व्याजदर 8 टक्के केला आहे. हा नवीन दर होम लोन आणि होम इम्प्रूव्हमेंटवर लागू होईल. हा व्याजदर 15 लाखांपेक्षा जास्त गृहकर्जावर आणि ग्राहकाच्या व्रेडिट स्कोअरच्या आधारावर मिळणार आहे, असे बँकेने म्हटले आहे. महिलांना 0.05 टक्के आणि 40 वर्षांखालील ग्राहकांना 0.10 टक्के अतिरिक्त लाभ मिळेल, असे बँकेने म्हटले आहे. ही सूट रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी खरेदी करणे आणि कर्ज शिफ्ट करण्यावरसुद्धा मिळणार आहे.