
बऱयाचदा काही वैयक्तिक कामांसाठी सहा महिने किंवा वर्षभराच्या बँक स्टेटमेंटची गरज भासते. कर्ज काढण्यासाठीही बँक स्टेटमेंट आवश्यक आहे.
जर तुमच्या बँकेने स्टेटमेंटसाठी जास्त पैसे आकारले तर त्वरित संबंधित बँकेशी संपर्क साधावा. त्यांना चुकीच्या शुल्क आकारल्या बद्दल माहिती द्या.
बँक स्टेटमेंटमध्ये काही चूक असेल तर तातडीने बँकेच्या ग्राहक सेवा पेंद्राशी संपर्क साधा. नेमकी काय चूक झालीय, हे बँकेकडून समजून घ्या.
बँकेकडे तक्रार नोंदवताना त्याची पोचपावती घ्या. अनधिकृत व्यवहाराची तक्रार लवकर करणे गरजेचे आहे. शुल्क का कापले गेले हे समजून घेणे गरजेचे आहे
बँक स्टेटमेंट नियमितपणे तपासा, जेणेकरून कोणत्याही चुका किंवा अनधिकृत व्यवहार लगेच कळतील. चूक झाल्यास त्वरित ही बाब बँकेच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.





























































