या रविवारी सुरू राहणार सरकारी बँक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सरकारी पैशांचे व्यवहार बघणाऱ्या सर्व सरकारी बँका या रविवारी ( 31 मार्च) सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने याबाबतचे निर्देश सर्व संबंधित बँकांना दिले आहेत. यंदाचा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस 31 मार्च आहे. 31 मार्चला रविवार आल्याने सरकारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कर आणि सरकारी कामांशी संबंधित इतर निधी भरण्यासाठी रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रखडलेली कामे पूर्ण करता यावीत यासाठी सरकारी व्यवहार बघणाऱ्या सर्व सरकारी बँका सुरू ठेवण्यात याव्यात, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे. सर्व सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी सरकारी बँका शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत तर रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. आरटीजीएस आणि एनईएफटी आणि इलेट्रॉनिक व्यवहारांसाठीही बँका या दिवशी जास्तवेळ कार्यरत राहणार आहेत.