केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक 2024 सादर केले. यामध्ये अशी तरतूद करण्यात आलीय की प्रत्येक खातेधारक एका खात्यासाठी चार नॉमिनी लिहू शकतात. सध्या एका बँक खात्यात एकच नॉमिनी असा नियम आहे. संसदेत हे विधेयक मंजूर झाले तर एका खात्याला चार नॉमिनी ठेवता येतील. पण ते बंधनकारक नसून ऐच्छिक असेल. लोकसभेत काही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकास विरोध केलाय. सीतारामन यांनी विरोधकांचे आक्षेप फेटाळले आहेत. हे विधेयक आल्यास मंजूर होईल की नाही याकडे लक्ष लागले आहे.