Baramati Plane Crash: अजित पवार यांचे दुर्दैवी निधन; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले. या घटनेने संपूर्ण देशात आणि राज्यात शोककळा पसरली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आणि अत्यंत वेदना झाल्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तबगार नेतृत्व गमावले आहे”, असे ते यावेळी म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर पाोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, “अजित पवार यांनी स्वत: ला महाराष्ट्राच्या विकास आणि समृद्धीसाठी स्वतःला वाहून घेतले होते. जनसामान्यांबद्दलची त्यांची तळमळ आणि सेवेप्रती असलेली त्यांची अतूट निष्ठा सर्वांनीच पाहिली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, हितचिंतकांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या प्रति माझ्या संवेदना मनापासून व्यक्त करतो,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली.

Baramati Plane Crash: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपले!- अरविंद सावंत