
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी (18 एप्रिल) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के सकाळी सुमारे 8:26 वाजण्याच्या सुमारास जाणवले, ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अधिकृत पातळीवर सविस्तर अहवाल अद्याप समोर आलेला नसला, तरी सुरुवातीच्या तपासणीत कोणतीही गंभीर घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जम्मू आणि कश्मीर तसेच संपूर्ण काश्मीर खोरे भूकंपप्रवण क्षेत्रात येते. हिंदुस्थान आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमारेषेजवळ असल्यामुळे या भागात वारंवार भूकंपीय हालचाली जाणवत असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


























































