WPL 2026 Schedule – महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू

जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील मेगा लिलावाच्या अगदी आधी चाहत्यांना याची माहिती देण्यात आली होती. BCCI ने घोषणा केली की ही, स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पहिला सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल आणि विजेतेपदाची लढत वडोदरा येथील BCA स्टेडियमवर होईल.

हिंदुस्थानने विश्वचषक विजयानंतर महिला प्रीमियर लीग आणखी लोकप्रिय होण्याची अपेक्षा आहे. गेल्या तीन हंगामांमध्ये या स्पर्धेची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. मुंबई इंडियन्सने २०२३ मध्ये महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम जिंकला. २०२४ मध्ये आरसीबीने ही स्पर्धा जिंकली. २०२५ मध्ये, मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजेता बनला. यावेळी कोणता संघ जिंकतो हे पाहणे मनोरंजक असेल.