बीसीसीआयचा नाडासोबत सहा महिन्यांचाच करार

bcci-logo

सामना प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रीय उत्तेजक सेवन प्रतिबंधक समितीपासून (नाडा) अद्याप दूर राहणाऱ्या ‘बीसीसीआय’ने अखेर त्यांच्यासोबत करार करण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून पुढील सहा महिन्यांसाठी बीसीसीआय व नाडा यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे. बीसीसीआयचे पदाधिकारी, प्रशासकीय समिती व आयसीसी यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आयसीसी, बीसीसीआय व नाडा यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. यानुसार नोंदणीकृत खेळाडूंची चाचणी नाडामार्फत केली जाईल. याआधी स्वीडन येथील आयडीटीएममार्फत खेळाडूंचे नमुने घेतले जात होते, मात्र या सहा महिन्यांत नाडाच्या कार्यपद्धतीवर बीसीसीआय समाधानी झाली नाही तर करार वाढवण्यात येणार नाही अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱयाकडून देण्यात आली.