अध्यक्षपदापेक्षा मैदानात खेळणे कठीण,बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलींचा षटकार

बीसीसीआय अध्यक्षपदाच्या जबाबदारीपेक्षा मला क्रिकेट मैदानात संघ कठीण स्थितीत असताना फलंदाजी करण्याचे आव्हान मोठे वाटते. कारण फलंदाजाला एकदाच आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी असते. इथे अध्यक्षपदी निर्णय घेताना चूक झाली तर ती सुधारता येते. मैदानात तशी संधी नसते, असा उत्तुंग शाब्दिक षटकार बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठोकला.

टीम इंडियाला विजयाची सवय लावणारा कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरभ गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून ‘स्पोर्टस्स्टार एसेस’ पुरस्कार सोहोळ्यादरम्यान पत्रकारांचे प्रश्नाचे बाऊन्सर्स अगदी सहज टोलवले. बीसीसीआय अध्यक्ष आणि क्रिकेटपटू यातील कुठली भूमिका तुम्हाला सोपी वाटते असे विचारले असता गांगुली तत्काळ उद्गारले, अर्थातच क्रिकेटच्या मैदानात संघ कठीण स्थितीत असताना फलंदाजी करणे मला अध्यक्षपद सांभाळण्यापेक्षा मोठे आव्हान वाटते. कारण फलंदाजी करताना मॅकग्राच्या यष्टय़ांबाहेर चेंडूला माझ्या बॅटची कड लागून झेल गेला की माझी खेळी संपली. तिथे पुन्हा चूक सुधारण्याची संधीच नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या