अटारी बॉर्डरवर रिट्रीट सुरू; हस्तांदोलन नाही

अटारी-वाघा सीमेवर 12 दिवसांनी आज बिटिंग रिट्रीट सोहळा पार पडला. सुमारे तासभर हा सोहळा चालला. ऑपरेशन सिंदूरनंतर 7 मे रोजी रिट्रीट बंद करण्यात आले होते. सीमा सुरक्षा दलाने यात काही बदल केले आहेत. रिट्रीट दरम्यान हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील गेट बंद ठेवण्यात आले होते. दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही.