कलरफूल सौंदर्य जपण्याचे घरगुती उपाय

74

श्रेया मनीष

होळीला परीक्षेच्या अभ्यासापासून थोडा वेळ काढून रंग खेळायचाच, पण त्याचबरोबर थोडी काळजीही घ्यायची…

रंग खेळायला प्रत्येकालाच आवडतो. होळीच्या रंगापासून कोणीच स्वतःला कोरडं ठेवू शकत नाही. पण त्याचबरोबर मनामध्ये कुठेतरी एक भीतीही दडलेली असते की होळीच्या केमिकलयुक्त रंगामुळे तुमची त्वचा तर खराब होणार नाही ना? पण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही मनसोक्त होळी खेळा, रंगही लावून घ्या आणि आपल्या त्वचेचं सौंदर्यही टिकवून ठेवा, कसं? पाहा ते –

अशी घ्या, केसांची काळजी

केसांना मुळापासून टोकापर्यंत भरपूर तेल लावा. मग त्यावर हवं तर एक अंडय़ाचा पांढरा भाग, एक वाटी दही आणि एक चमचा आवळा चूर्ण टाकून हे मिश्रण होळी खेळण्यापूर्वी केसांना लावून घ्या.

मग बघा ही सौंदर्य प्रसाधनं होळीच्या रंगांपासून कसं तुमच्या त्वचेचं संरक्षण करतील आणि आंघोळीनंतरही तुम्हाला तुमची त्वचा तशीच पूर्ववत मिळते.

त्वचेचे आरोग्य जपा 

आपण जेव्हा आपल्या त्वचेवर एखादं प्रसाधन लावतो तेव्हा ते त्वचेत खोलवर मुरतं. मात्र त्यावर तुम्ही जर दुसरं प्रसाधन लावलं तर ते मात्र त्वचेत खोलवर मुरत नाही. ते त्वचेच्या बाहेरच राहतं. त्याचा त्वचेला कसलाच परिणाम होत नाही. म्हणून होळी खेळण्यापूर्वी  चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. मग त्यावर सनस्क्रीन लोशन लावा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावून तुम्ही वापरत असलेली चांगल्या प्रतीची बीबी क्रीम लावा. नंतर फाऊंडेशन लावा आणि लूज पावडर लावून   मेकअप करा. या मेकअपवर दुसरा कुठलाही केमिकलयुक्त रंग वाईट परिणाम करणार नाही आणि तुमच्या त्वचेचंही रक्षण होईल.

ओठांच्या संरक्षणासाठी ओठांवर आधी लिपबाम लावा. मग लिप पेन्सिलीने आऊटलाइन काढून एखादी गडद रंगाची लिपस्टिक लावा. मग त्यावर टाल्कलकम पावडर लावून लिपस्टिक फिक्स करा आणि पुन्हा त्यावर लिपस्टिकचा एक थर लावा.

शरीराच्या संरक्षणासाठी संपूर्ण शरीरावर खोबरेल तेल चोळून घ्या. नखांनाही गडद रंगाची नेलपेंट लावून लॉक करा.

आपली प्रतिक्रिया द्या