बीडकरांना दिलासा, रविवारी 14 रुग्ण कोरोनामुक्त

850

बीड जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळत आहे. एकीकडे कोरोना पॉझिटिव्हची संख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी 14 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. आता केवळ 27 रुग्णांवरच उपचार सुरू असून आज सकाळी 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकामुळे कोरोनाच्या रुग्णांत मोठी वाढ झाली होती. मात्र प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन संक्रमण रोखले. एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाची संख्या अल्प असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या झपाट्याने वाढत आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 56 रुग्ण उपचार घेत होते. कालच 10 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवल्यानंतर रविवारी पुन्हा 14 रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 29 वर पोहोचत आहे. आता केवळ 27 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 3 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. दरम्यान आज सकाळी 38 नवे सॅम्पल पाठवण्यात आले आहेत

आपली प्रतिक्रिया द्या