
केज तालुक्यातील साळेगाव शिवारात झालेल्या ट्रॅक्टर, क्रूझर आणि कारच्या तिहेरी अपघातात एका ७५ वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ११ वारकरी गंभीर जखमी झाले. वाशिम जिल्ह्यातील दिंडी पंढरपूरहून परतीच्या मार्गाने जात असताना क्रूझर गाडीने दिंडीतील ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरमधील ७ वारकरी आणि क्रूझरमधील ४ असे एकूण ११ वारकरी जखमी झाले आहेत.































































