बीड : कार ऑईलच्या टँकरवर धडकली, अपघातात पाच जण ठार

बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ कार आणि ऑईल टँकरच्या भीषण अपघातात लातूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान तिघा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. मृत प्रवाशी हे लातूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

लातूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी लातूरहून संभाजीनगरकडे जात असताना गेवराईच्या बायपास रोडजवळ कारचालकाचा ताबा सुटल्याने कार ऑईलच्या टँकरवर जावून धडकली.

या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी दोघा जणांचा मृत्यू झाला तर तिघा जणांचा मृत्यू उपचारा दरम्यान झाला आहे.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या