बीड जिल्ह्यात 176 कोरोना रूग्णांची भर, एकूण आकडा पाच हजाराच्या पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात तब्बल 176 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. 1024 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 848 जण निगेटिव्ह आले आहेत. पुन्हा एकदा सर्वाधिक रूग्ण बीड तालुक्यातील आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 5109 पोहचली आहे. आज 62 जणांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 138 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालात कोरोनाची गति स्पष्ट होत आहे. 1024 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 176 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. तर 848 जण निगेटिव्ह आले आहेत. 176 पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई तालुका 16, आष्टी 19, बीड 46, धारूर 16, गेवराई 10, केज 11, माजलगाव 4, परळी 23, पाटोदा 6, शिरूर 11, वडवणी 14 चा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल सापडलेल्या 176 रूग्णांमुळे एकुण रूग्णांचा आकडा पाच हजाराच्या पुढे गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5109 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात 3612 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात 1359 रूग्ण उपचार घेत आहेत. आज शनिवारी रोजी 62 रूग्णांना सुट्टी दिली जाणार आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 138 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्युचा दर 2.70 एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 70.70 एवढा आहे.