बीड जिल्ह्यात सोमवारी 73 कोरोना पॉझिटिव्ह तर 74 जणांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी दुपारी प्राप्त झालेल्या 589 जणांच्या अहवालात 516 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर 73 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज 589 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये 516 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 73 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

यात अंबाजोगाई 13, आष्टी 14, बीड 25, धारूर 5, गेवराई 2, केज 6, माजलगाव 1, परळी 2, पाटोदा 1, शिरूर 2, वडवणी 2 एवढे आहेत. आज 73 जण एकीकडे पॉझिटिव्ह आले असताना 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 14 हजार 52 जण कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 12 हजार 860 जण कोरोनातून बरे झाले आहेत. 738 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 454 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.