
रविवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा 74 रूग्ण बाधित आढळले आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 31 हजार 112 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात 28 हजार 615 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 2574 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अजुनही जिल्हाभरातील गावागावात रूग्णसंख्या वाढत आहे.
बीड जिल्ह्यात रविवारी रात्री आलेल्या कोरोना अपडेटच्या अहवालात पुन्हा 74 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात अंबाजोगाई तालुक्यातील 5, बीड तालुक्यातील 26, गेवराई 1, केज 8, माजलगाव 9, परळी 9, पाटोदा 2, शिरूर 2, आष्टी 4, धारूर 5 आणि वडवणी तालुक्यातील तिघा जणांचा समावेश आहे. एकुण रूग्णांची संख्या 2574 च्या घरात गेली आहे. त्यात 1392 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर 1114 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसापासून शंभरपेक्षा जास्त रूग्ण बरे होवून घरी पोहचले आहेत. तर सोमवारी डिस्चार्ज मिळणाऱ्या रूग्णांची संख्या 200 आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



























































