बीड जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू; एक कोरोनाग्रस्त तर दुसरा संशयित, मृतांचा आकडा 13 वर

956

बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूचा दर वाढत आहे एका रात्रीतून दोघांचा मृत्यू झाला आहे एक कोरोना पॉझिटिव्ह होता तर दुसऱ्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज बीड येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या एका 78 वर्षीय वृद्धाचा तर केजच्या रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित 32 वर्षीय तरूणाचा मंगळवारी पहाटे अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात मृत्यू झाला.

केज तालुक्यातील नांदूरघाट येथील तरूणाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे केजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने सोमवारी दुपारी त्याचा स्वॅब घेण्यात आला. रात्री उशीरा तो अत्यावस्थ झाल्याने त्याला 12.30 वाजता अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात हलविण्यात आले. तिथे अवघ्या तासाभरात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरूणाच्या स्वॅबचा रिपोर्ट मंगळवारी येण्याची शक्यता आहे.तर बीड येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना ग्रस्त वृद्धाचा आज पहाटेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या