बीडमध्ये एका डॉक्टरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, संपूर्ण शहरासह 12 गावात संचारबंदी

5663

मुंबईहून गावाकडे आलेल्या एका रुग्णाला छातीत त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार घेतले. तरी रुग्ण गंभीरच होऊ लागला अखेर सीटी स्कॅनसाठी खासगी डायग्नोस्टिकमध्ये घेऊन नेले असता डॉ. सुधीर हिरवे यांनी सीटी स्कॅनचा रिपोर्ट आणि हृदयाचा रिपोर्ट बघून या रुग्णाला कोणताही आजार नाही तर कोरोना असू शकतो हा अंदाज व्यक्त केला आणि तो खरा ठरला. यामुळे मोठा अनर्थ टळला अखेर संपूर्ण बीड शहर अन 12 गावात आठ दिवसासाठी संचारबंदी लागू करण्यात आली.

पाटोद्याचा एक रुग्ण मुंबईहून आला मात्र त्याने ते लपवून ठेवले, छातीत त्रास होत असल्याने तो बीड मधील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला, पाटोदा येथून आल्याने त्या रुग्णालयाने ही खबरदारी घेतली दोन दिवस होऊनही प्रकृती मध्ये सुधारणा होत नसल्याने त्या रुग्णाचा सीटी स्कॅन करायचे डॉक्टरने सांगितले, रुग्ण सीटी स्कॅन काढण्यासाठी डायग्नोस्टिक सेंटरला गेला. या सेंटरवर पीपीइ किट घालूनच सोनोग्राफी अन सीटी स्कॅन केले जाते. परवा सायंकाळी सीटी स्कॅन काढला डॉक्टरने रिपोर्ट बघितला छातीतील बदल पाहताच या रुग्णाला दुसरा कोणताही आजार नाही कोरोना मात्र असू शकतो असा अंदाज व्यक्त करत डॉ सुधीर हिरवे यांनी विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरला ही माहिती दिली. विवेकानंद रुग्णालयातील संबंधित डॉक्टरने ही परिस्थितीची जाणीव ठेवत तातडीने जिल्हाशल्य चिकित्सक यांना सांगितले अन त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉ हिरवे यांचा अंदाज खरा ठरला, त्यांनी तातडीने पावले उचलली मात्र हा रुग्ण ज्या रुग्णालयात दाखल होता तेथे काही रुग्ण उपचार घेत होते, तीन रुग्णालयात फिरून आल्याने संपर्क मोठ्या प्रमाणात झालेला असू शकतो हा अंदाज बांधून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मध्यरात्री आदेश जारी करत संपूर्ण बीड शहरासह 12 गावात 4 जून पर्यन्त संचारबंदी लागू केली.

आपली प्रतिक्रिया द्या