बीडमध्ये राष्ट्रवादीला दणका, शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

5321

जयदत्त क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू झाली असून राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक समजले जाणारे रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष शेख बब्बरभाई आणि मनियार संघटनेचे अध्यक्ष शेख सलीम ईलियास यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

काही दिवसांवरच आता निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. तत्पूर्वी ना.जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक मुखीद लाला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक समजले जाणारे जिल्हा रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष शेख बब्बरभाई आणि मनियार संघटनेचे अध्यक्ष शेख सलीम ईलियास, सय्यद आमेर जावेद, शाखाध्यक्ष यांनी शेकडो कार्यकत्र्यांसह जयदत्त क्षीरसागर यांच्या मुंबई येथील सातपुडा निवासस्थानी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अ‍ॅड.सय्यद खाजा, सय्यद शाकेर, शेख युसूफ, शेख सलमान, सय्यद कलीम, सय्यद अयाज, शेख राजू, शेख अफसर, शेख आमेर, शेख जमील व बीड येथील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या