
शेतात जाणाऱ्या रस्त्यावर शौचास बसण्याच्या कारणावरून रामनगर भागात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी प्रेशर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात डॉ. सुदाम मुंडेसह पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
परळी शहरालगत असलेल्या रामनगर भागातील शेत रस्त्यावर देविदास पवार हे शौचास बसले होते. यावेळी शौचास बसू नको असे म्हणत डॉ. सुदाम मुंडे याने देविदास पवार, सखुबाई पवार यांना ढकलून देत काठीने मारहाण केली. यात दोघेजण जखमी झाले.
याप्रकरणी राहुल जाधव यांच्या फिर्यादीवरून डॉ. सुदाम मुंडे विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच मारहाणीवरून मुंडे याच्या फिर्यादीनुसार देविदास पवार, सखूबाई पवार, राहुल जाधव, सुनिता जाधव यांच्याविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास परळी पोलीस करत आहेत.
कोण आहे सुदाम मुंडे?
2012 मध्ये राज्यभरात गाजलेल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात सुदाम मुंडे चर्चेत आला होता. त्यानंतर वैद्यकीय परिषदेने त्याचा परवाना रद्द केला होता. त्यानंतरही कोविड काळात अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला होता.