
बीड शहरापासून जवळ असलेल्या मांजरसुबा घाटात इंधनाच्या टँकरला आग लागली. आग लागल्यानंतर मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. टँकरमधून आगीचे आणि धुराचे लोट बाहेर पडत असून, एक कि.मी अंतरापासून वाहतूक थांबवण्यात आली आहे. अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
मांजरसुबा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात आज इंधनाच्या टँकरला भीषण आग लागली आग लागल्यानंतर स्फोट झाला. इंधन उडाल्याने या परिसरात आगीने पेट घेतला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
























































