बीडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात,  दुचाकीस्वार जागीच ठार

 

बीडमध्ये एक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

गेवराई शहरातील ज्ञानेश्वर अशोक सांगुळे (वय 24)हा  गवंडीकाम हा व्यवसाय करत होता. शुक्रवारी मोटर सायकल वरून मजूर आणण्यासाठी शहराजवळील पांढरवाडी फाटा येथे गेले असता त्याच दरम्यान शहागड गेवराई कडे येणारी ट्रकचा ज्ञानेश्वर सांगुळे यांच्या गाडीला जोराची धडक दिली.

या धडकेत सांगुळे हे रस्त्यावर आपटल्याने त्याच्या डोक्यात व हातापायास गंभीर मार लागला. डोक्यातून जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याला ताबडतोब गेवराई उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी हलविण्यात आले. परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले होते.

याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेवराई शहरातून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याला खड्डे पडल्याने छोटे-मोठे किरकोळ अपघात घडत आहेत. तसेच रस्त्याला रस्ता दुभाजक नसल्याने कोणीही कसे वाहने चालवतात यामुळे ही अपघात घडत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या