महिलेच्या मेंदूमधून काढला चेंडू एवढा ट्युमर

बीड शहरातील काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटलने मेंदूमधील चेंडू एवढ्या मोठ्या ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत बीडमध्ये इतिहास निर्माण केला आहे. ज्या उचारासाठी बीडकरांना पुणे, मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरात जावे लागत होते ते सर्व उपचार काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वी पन्नास वर्षाच्या सदर महिलेला चक्कर, प्रचंड डोकेदुखी आणि मोठ्या प्रमाणात उलट्याचा त्रास होवू लागला. सदरील महिलेस स्वतःच्या पायावर चालणे देखील कठीण झाले होते. अशी लक्षणं सुरू झाल्याने आणि अधिक प्रमाणात त्रास वाढल्याने सदरील महिला रूग्ण न्यूरो फिजिशियन डॉ.अनिकेत पांडे यांच्याकडे गेल्या. महिलेस पुढील उपचारासाठी काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल बीड येथे पाठवले. यानंतर सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.समीर शेख यांनी महिलेस तपासून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सुद्धा हे कठीण आव्हान स्विकारले. न्यूरो सर्जन समीर शेख, भूलतज्ञ डॉ.श्रीकांत मोराळे, न्यूरो सहायक गणेश गायकवाड, प्रणव सपकाळ, रावसाहेब गिरी, मोमीन आदीब या न्यूरो टीमने महिलेच्या मेंदूत असलेल्या चेंडू एवढ्या मोठ्या ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीरिया पार पाडत इतिहास रचला. रूग्ण महिला पूर्ववत स्थितीत परतली असून आपले दैनंदिन जीवन निरोगी व सक्षमपणे जगत आहे. युनिटचे अध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर, डॉ.बालाजी जाधव, संचालक अजित वरपे तर प्रशाकीय अधिकारी सय्यद बशीर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या