
नक्षलविरोधी मोहिमेवर निघालेल्या जवानांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत 20 जवान जखमी झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनव बैस, पवन कोल, नरेंद्र धुर्वे आणि अजय मिश्रा अशी जखमी जवानांची नावे आहेत.
मध्य प्रदेशातील बालाघाट येथे ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी पालागोंदी जंगलात जवानांच्या एका तुकडीवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात सुमारे 20 जवान जखमी झाले. हॉक फोर्सचे जवान गोदरी छावणीतील आहेत. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आले होते. सैनिक तीन ते चार दिवसांपासून जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत होते.
























































