Video – मॅच दरम्यान बेन स्टोक्स भडकला; प्रेक्षकाला केली शिवीगाळ

743

इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुन्हा एकदा आपल्या कृतीने चर्चेत आला आहे. सध्या दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघामध्ये जोहान्सबर्ग येथे कसोटी सामना सुरू आहे. हा सामना सुरु असताना बेन स्टोक्स एका प्रेक्षकावर भडकला व त्याने त्याला शिवीगाळ केली

फलंदाजीसाठी उतरलेल्या बेन स्टोक्सला मैदानावर काही कमाल करता आली नाही. तो अवघ्या दोन धावा करून बाद झाला. तो निराश होऊन ड्रेसिंग रुमकडे परतत असताना एका प्रेक्षकाने त्याला डिवचले व त्याची तुलना पॉप गायक एड शीरनशी केली. ते ऐकल्यावर बेन स्टोक्सचा पार चढला व त्याने त्या प्रेक्षकाला शिवीगाळ केली. हा प्रकार कॅमेऱ्यांनी टिपल्यामुळे तो सर्वांनी पाहिला. या प्रकरणी आयसीसीने दंड ठोठावला असून, बेन स्टॉक्सच्या सामन्याच्या फीमधून 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. तसेच त्याची गुणसंख्याही एक अंकाने कमी करण्यात आली आहे.


त्यानंतर स्टोक्सने आपल्या वर्तवणुकीबद्दल त्याच्या ट्विटर अकाउंटवरून माफी मागितली. आपल्या ट्विटमध्ये त्याने लिहिले, “माझ्या अभद्र भाषेबद्दल मी साऱ्यांची माफी मागतो. बाद होऊन ड्रेसिंग रुमकडे परतताना हा प्रकार घडला. मी वापरलेल्या असभ्य भाषेसाठी मी माझ्या सर्व चाहत्यांचीही माफी मागतो.”

आपली प्रतिक्रिया द्या