भावानेच भावाचा काटा काढला! धावत्या कारमध्ये गळ्यावर चाकू फिरवला आणि…

बंगळुरूच्या कलबुर्गी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथे मोठ्या भावानेच आपल्या 24 वर्षीय लहान भावाची निर्घृण हत्या केली. आणि त्याचा मृतगदेह कारमध्ये भरून बंगळुरूतील एक तलावात फेकून दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर हत्त्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज (28) असे त्या आरोपीचे नाव असून धनराज (24) हे त्याच्या मृत भावाचे नाव होते. धनराज हा गुन्हेगारी वृत्तीचा आणि रागीट स्वभावाचा होता. त्यामुळे शिवराजला त्याचा प्रचंड राग यायचा. शिवराजने अनेकदा धनराजला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र धनराज त्याच्यावर ओरडायचा. मद्यपान करून चोऱ्या करणे, मारामारी करणे हे त्याचे रोजचे झाले होते.

शेजारच्या रहिवाशांनीही अनेकदा धनराजच्या या वर्तणुकीबाबत तक्रारी केल्या. शिवराजला या गोष्टींचा प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने आपल्या भावाचा कायमचा काटा काढायचे ठरवले. शिवराज कॅब ड्रायव्हर आहे. शिवराज आणि त्याच्या काही मित्रांनी मिळून धनराजला मारण्याचा प्लॅन केला. 2 नोव्हेंबर रोजी शिवराजने धनराजला फोन केला आणि तुला नोकरी मिळवून देतो सांगत त्याच्या 3 मित्राना धनराजला आणायला पाठवले.

दरम्यान या 3 मित्रांनी धनराजला बंगळुरूच्या NICE रोडवरून त्याला उचलले. प्रवासात धनराज पुढच्या प्रवासी सीटवर होता. यावेळी धनराज मोबाईल फोनवर व्यस्त असताना, संदीप आणि प्रशांत यांनी त्याला मागून पकडले आणि याच संधीचा फायदा घेत शिवराजने त्याच्या मानेवर चाकूने वार केले ज्यामुळे तो जागीच ठार झाला. यानंतर त्यांनी मृतदेह बन्नरघट्टा-कागलीपुरा येथील तलावात फेकून दिला. आणि इलेक्ट्रॉनिक सिटी-नाइस रोडजवळ कारची फ्लोअर मॅट आणि चाकू फेकून टाकला.

हत्येच्या 4 दिवसांंनंतर ६ नोव्हेंबरला पोलिसांना कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि  आरोपीला अटक केली आहे.