बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडलं? काय आहे सत्य…

456

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्लोरिडा आणि बर्म्युडा या भूभागाच्यामध्ये असणारा त्रिकोणी सागरी प्रदेश म्हणजेच बर्म्युडा ट्रँगल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आश्चर्यकारक गोष्टींमुळे चर्चेत असलेले आणि विमानं, जहाजं अदृश्य होणाऱ्या या ठिकाणाबाबत नवा दावा करण्यात आला आहे. बर्म्युडा ट्रँगल येथील अपघात १०० फुट उंच उसळणाऱ्या लाटांमुळे होतात, असा एका नव्या सर्वेक्षणाचा दावा आहे.

बर्म्युडा ट्रँगल या रहस्यमयी जागेबाबत अनेक दावे यापूर्वीही करण्यात आले आहेत. असे कोणतेही ठिकाण अस्तित्वात नसल्याचेही बोलले जाते. त्यामुळे जगातील कोणत्याही नकाशामध्ये बर्म्युडा ट्रँगल दाखवण्यात आलेले नाही. परंतु प्लोरिडा आणि बर्म्युडा या भूभागाच्यामध्ये असणाऱ्या त्रिकोणीय सागरी प्रदेशात हा भाग असल्याचेही बोलले जाते. यातील एका कोनात मियामी, दुसऱ्या कोनात सॅन जुआन आणि तिसरा कोन हा बर्म्युडा ट्रँगल असल्याचे मानले जाते.

bermuda03

बर्म्युडा ट्रँगल जवळपास ४ लाख ४० हजार मैल परिसरात पसरलेला आहे. गेल्या १०० वर्षात या ठिकाणी अनेक रहस्यमय घटना घड़ल्या आहेत. डझनभर जहाजं, विमानं या ठिकाणी गायब झालेली आहेत. यामुळे या भागाला भूतांचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही भयंकर नाव देण्यात आले आहे. सर्वात प्रथम १८७२ मध्ये द मेरी नावाचे एक जहाज या भागातून गायब झाले होते, याचा आजगायत कोणालाही शोध घेता आलेला नाही. त्यानंतर सर्वात भयंकर घटना ५ डिसेंबर, १९४५ रोजी घडली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकी लष्कराचे बॉम्बवर्षाव करणारे ‘फ्लाईट-१९’ हे विमान गायब झाले होते. यावर वायु दलाचे १४ पायलट होते. या भागाबाबत १६ सप्टेंबर, १९५० ला अमेरिकेच्या एका वर्तमानपत्रात लिहिण्यात आले तेव्हा जगाला असा कोणता रहस्यमय प्रदेश असल्याची माहिती मिळाली.

bermuda01

त्यापूर्वी १९१८ मध्ये अमेरिकेच्या नौदलाचे ‘यूएसएस सायक्लॉप्स’ हे जहाज गायब झाले होते. पहिल्या विश्वयुद्धादरम्यान अमेरिकेच्या लष्कराला आणि नौदलाला इंधनाचा पुरवठा करताना हे जहाज गायब झाले होते. यावर ३०९ लोकं होती. तसेच १९४१ ला यूएसएस सायक्लॉप्सचे अन्य दोन साथिदार असणारी जहाजं याच मार्गावरून गायब झाली होती. या भागाला १९६४ मध्ये ‘बर्म्युडा ट्रँगल’ हे नाव मिळाले. अमेरिकेचे लेखक विसेंट गॅरिय यांनी एका मॅगझीनच्या लेखामध्ये या नावाचा वापर केला होता. तेव्हापासून या भागाला बर्म्युडा ट्रँगल असे म्हणण्यास सुरुवात झाली.

bermuda04

बर्म्युडा ट्रँगलबाबत अनेक रहस्यमय दावे करण्यात आले आहेत, काय आहेत हे दावे –

>काही लेखकांचे म्हणणे आहे की या भागावर एलियन्सचे वर्चस्व असल्याने जहाजं, विमानं गायब होत आहेत. एलियन्स या भागाचा वापर पृथ्वीवरून आपल्या ग्रहावर जाण्यासाठी करतात. या भागात एखादे जहाज किंवा विमान पोहोचले तर ते रिसर्चसाठी आपल्या ताब्यात घेतात, असाही दावा करण्यात आला.

> काहींनी या ट्रँगलच्या खाली अटलांटिस शहर असल्याचे म्हटले आहे. येथून रहस्यमयरित्या उर्जा बाहेर पडते आणि त्यावरून जाणाऱ्या विमानं व जहाजांना आपल्या गिळंते.

> काहींनी या भागाखाली भव्य पिरामीड असल्याचे म्हटले आहे. याच्याशी टक्कर झाल्यानंतर जहाजं आणि विमान नष्ट होतात.

> काहींनी या भागात आफ्रिकन गुलामांचे आत्म असल्याचे म्हटले आहे. डॉ. केनीथ मॅकॉल यांनी ‘हीलिंग द हॉन्टेड’ या पुस्तकात बर्म्युडा ट्रँगलमध्ये भूतांचा आवाज येत असल्याचे नमूद केले आहे.

यासह सरकारी पातळीवर आणि काही वैज्ञानिकांनी वैयक्तीक पातळीवरही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या