बेस्टची रोजची प्रवासी संख्या 10 लाखापुढे 

907

बेस्टने सर्वसामान्यांसाठी सेवा सुरू केल्यानंतर गुरुवारी एकाच दिवसात बेस्टच्या प्रवाशांची संख्या 10 लाखांवर गेली आहे. बेस्टने विरार,पनवेल आणि बदलापूर परिसरातील अत्यावश्यक सेवा बंद केल्याने आता जादा बसेस सोडल्या जात असून बेस्टच्या तिजोरीत हळूहळू भर पडत आहे. मात्र, लॉकडाऊन पूर्वीची आकडेवारी त्यापेक्षा विसंगत आहे.

बेस्टचे तिकीट किमान पाच रूपये केल्यानंतर बेस्टची दररोजची प्रवासी संख्या 28 लाखापर्यंत गेली होती तर उत्पन्न 1 कोटी 80 लाखापर्यंत गेले होते. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर बेस्टने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी फेर्‍यांमध्ये वाढ केली आहे. बेस्टच्या ताफ्यात सुमारे 3,500 बस असून त्यापैकी कमाल गाड्या सेवेसाठी उतरविण्यात येत आहे. बेस्टने गुरुवारी 3,222 बस चालविल्या. त्यातून 10 लाख 26 हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला. तर उत्पन्नाचा आकडा 9 लाख 23 हजारांवर पोहोचला आहे.

उपनगरीय लोकल केवळ सरकारी आणि अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी धावत असली तरी खाजगी क्षेत्रातील नोकरदारांची संख्या जादा असल्याने त्यांच्यासाठी बेस्टच खरी लाइफ लाइन ठरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या