Viedo – सुपरडुपर झेल! 2019 वर्ष ‘या’ खेळाडूंनी गाजवले, घेतले अफलातून झेल

‘कॅचेस विन मॅचेस’ अशी म्हण क्रिकेटमध्ये प्रचलित आहे. ‘क्षेत्ररक्षण’ म्हटले की सर्वांत आधी आपल्या डोक्यात नाव येते ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्सचे. जॉन्टी रोड्सला क्षेत्ररक्षणाचा ‘किंग’ म्हटले जाते. त्याच्यामुळेच क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणही सामन्याचे चित्र पालटू शकते हे सिद्ध झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2019 या वर्षात क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी शानदार झेल घेतले. पाहूया त्याचा थोडक्यात आढावा…

बेन स्टोक्स –

stokes
यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप इंग्लंडमध्ये पार पडला. या स्पर्धेदरम्यान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या लढतीदरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने एक अफलातून झेल घेतला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एंडिल फेहलुकवायो याने आदिल रशिद याच्या गोलंदाजीवर मिड-विकेटच्या दिशेने एक जोरदार फटका मारला. चेंडू थेट सीमारेषेपार जाईल असे वाटत असतानाच बेन स्टोक्सने हवेत सूर लगावत झेल घेतला. स्टोक्सचा हा झेल येती अनेक वर्षे क्रिकेट रसिकांच्या आठवणीत राहील.

स्टीव्ह स्मिथ –

smith
ऑस्ट्रेलियाच्या संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून स्टीव्ह स्मिथ याच्याकडे पाहिले जाते. न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या कसोटीमध्ये स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या स्लिपमध्ये अफलातून झेल घेतला. स्मिथने हवेत सूर मारत एका हाताने झेल घेतला आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्स याला पवेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या चपळाईचे क्रीडाप्रेमींना चांगलेच कौतुक केले.

शेल्डन कॉटरेल –

cottrell
वेस्ट इंडीजचा ‘आर्मी मॅन’ शेल्डन कॉटरेल याचे विकेट घेतल्यानंतरचे सेलिब्रेशन सर्वांनाच माहिती आहे. लष्कर स्टाईलमध्ये सॅल्यूट ठोकणाऱ्या कॉटरेने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत अविश्वसनीय झेल घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने फ्लिक केलेला चेंडू सीमारेषेपार जात असताना कॉटरेल याने एका हाताने पकडला. यानंतर संतुलन बनवत पुन्हा आत फेकला आणि झेल घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या