‘बेस्ट’च! चलो अ‍ॅपवर तिकीट काढल्यास 20 ते 34 टक्के सूट!!

मुंबईकरांचा प्रवास आरामदायी व आणखी स्वस्त करण्यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाने नवी योजना आणली आहे. यामध्ये ‘चलो ऍप’वर तिकीट काढल्यात तब्बल 20 ते 34 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवासी ‘बेस्ट’ चलो ऍप’ आणि ‘बेस्ट चलो कार्ड’च्या माध्यमातून तिकीट काढू शकणार आहेत.

रेल्वेनंतर ‘बेस्ट’ही मुंबईची दुसरी लाइफ लाइन आहे. ‘बेस्ट’कडून प्रवाशांना दर्जेदार सुविधा आणि वाजवी दरात प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 1 डिसेंबरपासून ‘चलो ऍप’कर हा प्लॅन लागू होणार असून ‘चलो कार्ड’कर 3 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

डिजिटल प्रणालीला प्रवाशांची पसंती
मुंबईत सुमारे 30 लाख प्रकाशांनी ‘चलो ऍप’ डाऊनलोड केला असून सुमारे 25 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकासी त्याचा दररोज कापर करत आहेत. नोक्हेंबरमध्ये पाच लाख डिजिटल फेऱया दिकसाला होत होत्या. डिजिटल तिकिट प्रणालीचा अकलंब केल्यापासून आतापर्यंतची ही सर्काधिक आकडेकारी आहे. या डिजिटल प्रणालीचा वापर वाढावा यासाठी नकीन प्लॅन तयार करण्यात आला आहे.