बेस्टच्या वीज उपक्रमात `सोशल डिस्टिंन्सग’चे तीन तेरा

424

बेस्टच्या वीज कामगारांना कोणत्या परिस्थिती काम करावे लागते याचे विदारक दृश्य साऱ्यांनाच हादरविणारे आहे. कोणताही पीपीई किट नाही की एक मीटरचे ‘सोशल डिस्टन्सिंग’नाही. २४ तास कार्यरत असलेल्या या कामगारांना आता शंभर टक्के उपस्थितीचे फर्मान काढले गेले आहे.

मुंबईतील चुनाभट्टी पासून ते थेट कुलाबा, तसेच बॅकबेपर्यंतच्या भागात वीज पुरविण्याचे काम बेस्ट करते. कोणतीही नैसर्गिक परिस्थिती असू दे या विभागातील सर्व कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरून काम करीत असतात. बेस्ट प्रशासनाने विद्युत पुरवठा विभागातील बाह्य कर्मचाऱ्याना म्हणजे केवळ रस्त्यावर काम करणाऱ्या कोरोना योद्धयांना कामावर १०० टक्के उपस्थित राहण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नैराश्य पसरले आहे.

असेही लढतायेत बेस्टचे योद्धे
एक दिवसाआड कामावर बोलावले तर आजारी पडणार नाहीत आणि कामही योग्यरीतीने होईल असे कामगारांचे म्हणणे आहे. याप्रकरणी बेस्टचे अध्यक्ष व महाव्यवस्थापक यांनी लक्ष घालावे अशी मागणी सर्व कामगार संघटना करीत आहेत. रस्त्यावर उतरून काम करणाNयांमध्ये मीटर वाचन, रस्त्यावर केबल टाकणारे, मीटर लावणारे, लाईट गेल्यावर ती सुरळीत करणारे अशा कर्मचारी वर्गाचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या