बेस्ट कर्मचाऱ्यांना सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळाला कोविड भत्ता, कामगार संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाला जाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best mumbai own buses count decreases private wet lease buses rise

कोविड महामारी काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या सेवेत तत्पर राहिलेल्या बेस्टच्या निवृत्त कर्मचायांना सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी कोविड भत्ता मिळाला. बेस्ट कामगार सेनेसह विविध कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बेस्ट प्रशासन जागे झाले आणि 9077 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात कोविड भत्त्याची रक्कम जमा केली. आता कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटी तसेच अन्य देयकांचा प्रश्न कधी सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रलंबित ग्रॅच्युईटी, दिवाळी बोनस, कोविड भत्ता व इतर अंतिम देयके मिळवण्यासाठी निवृत्त कर्मचारी लढा देत आहेत. गतवर्षीपासून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी प्रशासनाने केवळ आश्वासन दिले. कोविड काळातील सेवेबद्दल तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता जाहीर केला होता, मात्र नंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.