भाईजान ठरला शब्दाचा पक्का, सलमानच्या आगामी सिनेमात झळकणार राजपाल यादव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या बिग बजेट अॅक्शन चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. मुख्य बाब म्हणजे आता या चित्रपटात त्याच्यासोबत राजपाल यादव देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी राजपाल यादवची एका बक्षिस समारंभात मस्करी करण्यात आली होती. त्याच्यावर असलेले लोन त्याला चुकवावे लागणार असे म्हणत राजपालची सर्वांसमोर मस्करी करण्यात आली होती. त्यावेळी एकटा सलमान खान हा राजपालच्या बाजूने ठामपणे उभा राहिला होता. आता त्याने त्याचे बोलणे सिद्ध करत राजपालला त्याच्या सिनेमात घेत नवीन काम देऊ केले आहे.

अलीकडेच, एका पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत असताना, एका ज्येष्ठ पत्रकाराने राजपाल यांच्यावर टोमणा मारला. त्यांनी राजपाल यांच्या ९ कोटी रुपयांच्या (अंदाजे १.९ दशलक्ष डॉलर्स) कायदेशीर खटल्याचा उल्लेख केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राजपाल म्हणतो, “रुपया, डॉलर, सगळंच चढ-उतार होत आहे. मला काहीच कळत नाहीये, मी फक्त तिथे बसून ‘शांती, शांती, शांती’ म्हणत आहे.” यावर ज्येष्ठ पत्रकाराने म्हटलं की, “राजपाल भाई, डॉलर आणि रुपया कितीही चढ-उतार झाले तरी, तुम्ही घेतलेली रक्कम तुम्हाला परत करावीच लागेल.” यावेळी सलमान खानने ‘एक्स’वर एक पोस्ट लिहून राजपालला पाठिंबा दिला होता.

राजपाल यादव हा सलमान खानच्या ‘राईट हँड’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे राजपाल आणि सलमानची केमिस्ट्री पाहण्याची प्रेक्षकांनाही आता उत्स्ुकता लागली आहे. यापूर्वी सलमान आणि राजपाल हे दोघेजण ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘पार्टनर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र होते. त्यांची दोघांची जुगलबंदी ही प्रेक्षकांना कायम भावलेली आहे. राजपालच्या आयुष्यात सध्या अनेक वैयक्तिक अडचणी आहेत. याच अडचणींमध्ये आता सलमानने राजपालला दिलासा दिलेला आहे.

ॲक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात सलमान, नयनतारा आणि राजपाल यादव यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आता कमालीचे उत्सुक आहेत.