भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील एका तरुणाने इमर्जेंसी हेल्प मोबाइल ॲप तयार केलं आहे. अपघातावेळी आपला मोबाइल लॉक असल्यास घरच्यांना त्याची माहिती कळवता येत नाही. त्यासाठी एक क्यूआरकोड आपल्या दुचाकीला लावला जाईल आणि या ॲप मध्ये ज्या व्यक्तीचा नंबर घातला असेल असा व्यक्तीला अॅलर्ट मिळेल. त्यामुळे घरच्या लोकांना तात्काळ माहिती मिळताच गूगल मॅप च्या सहाय्याने अपघात स्थळाचे लोकेशन मिळूं शकते. अशा वेळी अनोळखी व्यक्ती सुद्धा या क्यूआरकोडच्या माध्यमांतून अपघात झालेल्या व्यक्तीची ओळख पटवू शकते. अशा प्रकारचं हे ॲप देशातील पहिलं अॅप असल्याचा दावा केला जात आहे. नागरिकांना या अॅपने मोठी मदत होणार आहे.