11 शहरांत पोहोचली कोवॅक्सिन, भारत बायोटेककडून साडे सोळा लाख डोस दान

देशाची पहिली कोरोनावरील लस भारत बायोटेक कंपनीने विकसित केली आहे. कोवॅक्सिन ही देशातील 11 शहरांत पोहोचली आहे. तर 16 जानेवारी पासून लसीकरण सुरू होणार आहे. भारत बायोटेकने पत्रक जारी करत बुधवारी 11 शहरांत ही लस पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील गणवरम, गुवाहाटी, पाटणा, दिल्ली, कुरुक्षेत्र, बेंगरुळू, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनौमध्ये ही लस वितरित करण्यात आली आहे. ज्या शहरांत ही लस पोहोचली नाही ती लवकरच पोहोचले असे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेकने हिंदुस्थान सरकारला 16.5 लाख लस दान केल्या आहेत.

हिंदुस्थान सरकारने भारत बायोटेकला 55 लाख कोरोना लसीची ऑर्डर दिली आहे. कोवॅक्सिनला 2 ते 8 डीग्री तापमानापर्यंत स्टोर करण्याची मुभा आहे.

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस देण्यात येणार असून त्यात कोरोना योद्द्यांचा समावेश आहे. त्यानंतर 50 हून अधिक वय असलेल्या 27 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या