लस कोणी घ्यावी, कोणी नाही! भारत बायोटेक, सिरमने जारी केले माहितीपत्रक

कोरोना लसीच्या दुष्परिणामांची चिंता सतावत असतानाच भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिटय़ूट या लस उत्पादक कंपन्यांनी माहिती पत्रक जारी केले आहे. यात कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये, याबाबत सल्ला देण्यात आला आहे.

भारत बायोटेकचा सल्ला

गर्भवती व स्तनपान करणाऱया महिला, कोरोनाची दुसरी लस घेतली असेल, तसेच कोणतीही अॅलर्जी, खूप ताप वा अन्य कोणताही गंभीर आजार असेल तर अशा लोकांनी कोवॅक्सिन लस घेऊ नये, असा सल्ला भारत बायोटेकने दिला आहे.

सिरम इन्स्टिटय़ूटचा सल्ला

रक्तस्त्राव, ताप, कोणतेही औषधे वा लस घेतल्यानंतर अॅलर्जीचा त्रास, प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारी औषधे घेतली जात असतील, गर्भवती वा नजिकच्या काळात गर्भधारणा राहू शकेल अशा महिला, स्तनपान करणाऱया महिला तसेच अन्य पुठलीही कोरोना लस घेतलेल्या लोकांनी कोविशिल्ड लस घेऊ नये, असे सिरम इन्स्टिटय़ूटने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या