महाराष्ट्रामध्ये ‘नरेटिव्ह’ खूप गाजत आहे. सर्वात जास्त नरेटिव्ह कोण चालवत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. पूर्वी अनाजी पंतांनी छत्रपतींचा छळ केला. फडणवीस हे आधुनिक काळातील अनाजी पंत आहेत. महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचे काम फडणवीसांनी केले. उद्धव ठाकरे यांच्यासारखा सुसंस्कृत, सभ्य, सर्वसमावेशक नेता एका बाजूला आहे, तर दुसऱया बाजूला कटकारस्थान करणारा, कपटी टरबुज्या आहे. त्यामुळे सुसंस्कृत उद्धव ठाकरे पाहिजे की कपटी टरबुज्या हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावे, असे आवाहन शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केले आहे.
शिवसेनेकडे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. याच विचारांचे शस्त्र्ा घेऊन शिवसैनिक लढला आणि प्रत्येक लढाईत विजयी झाला. शिवसेनेचे आमदार, खासदार पह्डले, पक्ष आणि शिवसेनाप्रमुखांचा पह्टो भाजपाने चोरल्याने अनेकांना शिवसेना संपली असे वाटले, मात्र गद्दारीनंतर शिवसैनिक अधिक पेटून उठला. निवडून आलेले आमदार, खासदार सोडून गेले तरी निवडून देणारा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला, असे भास्कर जाधव म्हणाले.