VIDEO:मुंबईकरांना खूशखबर…भातसा धरण ओव्हरफ्लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने आज भातसा धरण ओव्हरफ्लो वाहू लागले. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून 68.67 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’ राहणार आहे. तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर ही धरणे यापूर्वीच ओसंडून वाहू लागली आहेत. दरम्यान, भातसा नदीच्या दोन्ही तीरांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा धरणाची उंची 142 मीटर असून यामध्ये पाण्याचा एकूण साठा 884.522 दशलक्ष घनमीटर आहे